कालबाह्यच !!!

Started by Kumar Sanjay, January 02, 2017, 09:54:48 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

गुलाबी थंडीत खितपत पडलेल्या
वयोवृद्धासारखा
शेल्फमधील जुन्या डायरींचा संग्रह
एंकाकी नवल वर्षासोबत
प्रत्येक पानावर विगत स्मुतीची
कालबाह्य संदर्भ

अन् अल्लड चुंकाचे
दाखले बाकीच
काही प्रिय दिवसांना
रेखांकित केलेलं टाचण
जुने अल्बम मधील बाहेर
डोकावणारे तंरगते छायाचित्रे

एक मधुर अवाचित
मोैन प्रेमपञ बंदिस्त
वेदनेचे शब्दशिल्प
अंलकरानी सजलेले
अप्रकाशित उपनिषद
विरह साधनेत

अपूर्ण संकल्प आणि
अनियोजित
सरकारसम काही 
कागदी स्वंययोजना
उरलेल्या मनाच्या
मौद्रिक नीतित

रेगांळले काही पाऊले
नेहाचे संदर्भ अन् प्रीतीचे
भावनिक अावेदन
कालबाह्यच ...


                  कुमार संजय
                  7709826774