डेट तुझी माझी स्मरते...

Started by shashank pratapwar, January 13, 2010, 09:52:43 AM

Previous topic - Next topic

shashank pratapwar

डेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
पार लागलेली होती वाट ती खिश्याची.

उगी भीती नव्हती,मजला तुझ्या खर्चाची,
पांगळया बजेट ची माझी झाली पार गोची,
तुला मुळी नव्हती पर्वा, होटेलच्या बिलाची.

क्षुद्र किमंतीची छोटी नाकारून भाजी,
स्टार्टर सहीत आर्डर केली पनीरची भुर्जी,
तुला परी जाणीव नव्हती, मेनू कार्डाची.

भूक माझी मेली होती पाहून तुझी थाली,
हिशोबावर माझ्या तेव्हा प्रश्न चिन्हे आली,
हातांनी घासली भांडी,होटेल्च्या किचनची.

उगीच्याच फूकटया भेटा, उगीचाच व्याज,
बुक्कीवर लात बसावी, अशी जिरली खाज,
मालकालाही दया आली ,दशा पाहताची.

- शशांक प्रतापवार

santoshi.world


Mayoor

हातांनी घासली भांडी,होटेल्च्या किचनची... :D :D :D

MK ADMIN

हातांनी घासली भांडी,होटेल्च्या किचनची
ha ha   :P

Too Good to be true :P

gaurig


PRASAD NADKARNI