लिलाव

Started by Parshuram Sondge, January 05, 2017, 07:26:20 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

टोच्या

माणसे नकोतच त्यांना
प्रेतांचाच गाव पाहिजे.

लोकशाहीत ही त्यांना
मताचा लिलाव पाहिजे.

जातीजातीचा गटाव नि
पेटलेला माणूस पाहिजे.

इमानाच्या कशास बाता ?
लबाडांचा चेला पाहिजे.

भाडखाऊ सारे दलाल
सावांचा चेहरा पाहिजे.

विचार, नि कसले तत्व ?
लाचारांचा तांडा पाहिजे.

लोकशाहीत या भारतात
गुलामांचा थवा पाहिजे .

जगावे कसे मरावे कसे ?
संता थोडा भाव पाहिजे
*******************
     परशुराम  सोंडगे,पाटोदा
       9673400928
Pprshu1312