वाट बघतोय?

Started by Kumar Sanjay, January 05, 2017, 12:00:43 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

का इतके भितो आम्ही सर्व
बनावटी काळोख्याला
भितोय अमानवी विचाराना
सहन करतोय
लाचारी आणि वेैचारिक गुलामगिरी

विकली जातात जिथे
कन्यारुपी स्वाभिमान
होतात नैतिक मानवी बलात्कार
बघण्याचे सोंघ अाणि मोैन धारण
करणारे भीष्म पितामह

पण....

तेजोमय भास्कराचा उदय होत आहे
बंदिस्त नेैञ असणारा बुध्द
जागृत होत आहे
विणेचे सुर निखारे ओकताय
युगीन पांचजन्य

कुष्णप्रिय पार्थाची वाट बघतोय


                     कुमार संजय ...