कविता II सीता रागाने हनुमंताला , "तुझ्या आईची चुतरी " म्हणाली II

Started by siddheshwar vilas patankar, January 05, 2017, 07:36:50 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


गावात चावडी भरून भरून

टपोरी टाळकी वैतागली

बंड्याच्या डोक्यात अचानक

नवी कल्पना आली

नाना नखरे पूर्ण करावयास

रामलीला सुरु झाली

इतिहास ठावं नव्हता त्यास्नी

थोडी का होईना पण

डोक्याची आई बहीण एक झाली

बंड्या हट्टाने राम झाला

नान्या लक्ष्मण तर बाब्या हनुमान झाला

कादर धिप्पाड रावण अन कवट्याची सीता झाली

सकाळ संध्याकाळ तालीम रंगली

वडाच्या पाराखाली रामलीला बनली

ऐन जत्रेत भर स्पर्धेत

प्रयोगास सुरुवात झाली

सारे शिलेदार तोबरे भरून तयार

रामाची मंचावर एंट्री झाली

पडद्याआड सीतेची धुसफूस चालू होती

हनुमंताची उधारी बाकी होती

राम व्हता साक्षीदार

रावण बाजूस उभा होता गप्प

ड्रेस घालून नक्षीदार

सीता रागाने हनुमंताला

"तुझ्या आईची चुतरी " म्हणाली

अन युद्धास सुरुवात झाली

पडद्यामागचं पुढं आलं

होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं

गाव हसून हसून मेलं

बंड्यासकट सर्वांचं तोंड काळ झालं


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C