नको आम्हा साक्षात्कार...

Started by Ankush S. Navghare, Palghar, January 06, 2017, 12:30:10 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

नको आम्हा साक्षात्कार
नको यातना अपार
गुरूचरणच द्यावे पूजावया...

नको आम्हा खीर
नको पंचामृत आणि नीर
गुरूचरणामृतच द्यावे प्राशावया...

नको आम्हा आमंत्रण
नको ल्यावया पीतांबर
गुरुसनिधच द्यावे बसावया...

नको आम्हा श्रीखंड
नको पंचपक्वान्नं गोड
गुरूवचनामृतच द्यावे सेवावया...

नको आम्हा इच्छामरण
नको राजघराणं
गुरुचरणातळी मिळावे जन्मावया...
गुरुचरणातळी मिळावे जन्मावया...

...अंकुश नवघरे. (पालघर)
दि.०६.०१.२०१७
वेळ. ०.२२ रात्रौ.