ती सध्या काय करते

Started by sagar dubhalkar, January 06, 2017, 11:39:35 AM

Previous topic - Next topic

sagar dubhalkar

दारात तिच्या पायऱ्यावर बसून
ति निवांत केस विंचरायची
तेंव्हा ति ईतकी खूश दिसायची
कि बाजुचं सगळंच जग विसरायची
         मी भिंतीआडूनच बघायचो
         एखाद्या चोरासारखा
         अन् रुसून बसलेल्या पोरासारखा

मधून मधून नखावर नख लावून
काहीतरी दाबल्यासारख दिसं
तेंव्हा ती यड्यागतच दिसं
अन् यायच मला हसं
         पण मी मलाच चिमटा काढे
        अन् कधिच हसलो नाही
        समोर असूनपण मी तिला दिसलो नाही

मग मस्त केस विचरुन झाल्यावर
केसाचा गुंता कच-यात टाकायची
मीपण तिच्या जगण्यातला गूंता होईन कि काय
ह्याची मनोमन भिती वाटायची
        म्हणून तिला कधी बोल्लोच नाही
        लपून राहिलेलं मनातलं
        अन् चोरून पाहिलेल्या प्रेमातलं

ऊन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये ती एकदा
तिच्या मामाकडे गेली
शाळा सुरू झाली, वर्षही संपलं
पण ती कधीच परत नाही अाली
        आताही मी वाट बघतो तिची
        आणि वाट बघण्यातच रात सरते
        काय माहित ' ती सध्या काय करते '

       Sagar Dubhalkar
        Whats App 9604084846