पुतळा एक वास्तव   

Started by mrunalwalimbe, January 07, 2017, 09:43:07 AM

Previous topic - Next topic

mrunalwalimbe

टिळक फुले यांच्या भूमीत
जन्म माझा
कर्वे आगरकर यांच्या कर्मभूमीत
वाढलो मी
अत्रे गडकरी यांच्या साहित्यात
लोळलो मी
सुशिक्षित सुविद्य मी
परि रिक्तच राहिलो मी
ना कुणाचा आदर
ना कुणाची भिती
बेधुंद उच्छृंखल असा मी
करूनी पुतळ्याची विटंबना
कसा कोडगा झालो मी
ना कशाची चाड
ना कशाचा भाव
स्वत:च्या फुशारकीतच
हरवून गेलो मी
माझ्यातला माणूस मरून
हाडामासाचा सापळाच 
झालो मी

मृणाल वाळिंबे