Virtual  आणि  भावना   

Started by mrunalwalimbe, January 07, 2017, 09:45:49 AM

Previous topic - Next topic

mrunalwalimbe


 
आताशा आम्ही 
खरचं खूप झालोय virtual  
FB फ्रेन्डस् 
WhatsApp ग्रुप यांनीच 
तर व्यापलयं आमचं जीवन  
Real जगणे  आम्हाला नाही ठाऊक  
खऱ्याखुऱ्या जिवंत लोकांना 
देतो आम्ही टांग 
छाटत बसतो WhatsApp वर चॅट 
आताशा कोणीच नाही असा 
जो नसे FB वरी 
कोणीच नाही क्षुल्लक 
जो न बाळगी स्मार्ट फोन 
साऱ्या भावना आम्ही 
WhatsApp वर जगतो 
खरखुरं प्रेम करणं 
खराखुरा आनंद साजरा करणं 
खरखुरं दु:ख करणं 
आताशा आम्हाला  जमतंच नाही  
Digitization या जमान्यात 
आमचं मनही झालयं झिरो digit 
ना कसली भावना 
ना कसाला आनंद 
ना कसले दु:ख 
साराच संवाद चिन्हांचा 
खेळ 
इच्छा माझी एकच 
या नवीन वर्षी तरी 
कोरी मने व्हावी दूर 
अन् घडावा संवाद समोरा समोरं 
 
मृणाल वाळिंबे