तू माझी प्रेयसी

Started by mrunalwalimbe, January 07, 2017, 10:25:39 AM

Previous topic - Next topic

mrunalwalimbe


दिसलीस तू जीव वेडावला
तुला बघताच माझा
कलिजा खलास झाला
तुझ्या पापण्यांच्या उघडझापीने
हृदयात स्वर उठला
तव ओष्ट विलगले
अन् मनात माझ्या झंकार उठला
तुझ्या हास्यातच
मला स्वर्गसुखाचा उन्माद झाला
तू तू अन् तू चारी ठाव
माझ्या दिलाने तुझाच ध्यास घेतला
ही सच्च्या प्रेमाची
अनुभूती तुला पाहताच झाली
माझा न च राहिलो मी
संपूर्ण तुझाच झालो
       मृणाल  वाळिंबे