असतेस कुठे हल्ली ?

Started by Parshuram Sondge, January 08, 2017, 09:49:20 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

असतेस कुठे हल्ली
गाव उदास असतो.
तुझे भास होती पण
चंद्र भकास हसतो.

बोलत नाही काही
वारा उगाच वाहतो. 
सा-या सुन्याच वाटा
पाऊल पुढे न पडतो.

गंधून मोगराही वेडा
मनात फक्त झुरतो.
रंग नभीचा सावळा
उरात लगेच विझतो.
       परशुराम  सोंडगे, पाटोदा.





Pprshu1312