ती सध्या काय करते

Started by mrunalwalimbe, January 08, 2017, 10:44:34 AM

Previous topic - Next topic

mrunalwalimbe



साऱ्या बंधनाना झुगारून
स्व:ताला सिध्द करते
जुन्या रुढिंना न जुमानता
स्व:तहाची ओळख निर्माण करते
संसाराचा गाडा रेटत
Corporate मध्येही आपलं वर्चस्व दाखवते
पुरुषांच्या बरोबरीने
खांद्याला खांदा भिडवून
सारीच क्षेत्र पादाक्रांत करते
एक मात्र नक्कीच
पूर्वीची ती आता खूप बदलली आहे
कणखर सक्षम स्वावलंबी  झाली आहे
अन् मर्दानगीच्या भाकड कल्पनांतून
तुम्ही कधी बाहेर पडता
याची वाट बघते आहे

मृणाल वाळिंबे