पाहुणे

Started by Asu@16, January 08, 2017, 12:31:54 PM

Previous topic - Next topic

Asu@16

     पाहुणे

आले पाहुणे, गेले पाहुणे
घरा काही उमगले नाही.
उंबरठ्याने केला बाय बाय
शब्दावाचून समजले नाही.
नाती गोती चार भिंतीत
आभासी जग झाले ग्लोबल.
मोबाईल झाले विश्व आमुचे
जगणे झाले हाय लेव्हल.
पाहुणे म्हणजे उगाच संकट
वैताग आणि नुसतीच वटवट.
सुट्टीलाही आराम नाही
दिवसभराची उगाच कटकट.
रिकाम टेकडे पूर्वज आमुचे
पाहुणे म्हणजे देव सांगती.
उगाच इथे वेळ कुणाला
पाहुणे पाहता स्वप्ने भंगती.
मी घरचा राजा माझ्या
नियम इथले वाचून या.
पाहुणे म्हणजे कोण तुम्ही ?
घरात माझ्या वाकून या.

- अरुण सु पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita