ब्रम्हकमळ

Started by Asu@16, January 08, 2017, 12:42:13 PM

Previous topic - Next topic

Asu@16

     ब्रम्हकमळ

इकडे तिकडे चोहीकडे
फुलल्या बागा, फुले अनेक
फिरलो क्षणभर, फिरले डोळे
प्रवेश देईना कुणी एक
नीतिमत्तेची ऊंच कुंपणे
घातली कुणी धूर्तपणे
काटे कितिक मना बोचले
तरी ना सोडी मन चोचले
करून मग मनात वादा
हंसून म्हटलं माळीदादा
फुले तुमची डेरेदार
सुगंध त्यांचा दिशा चार
घेऊ द्या ना थोडीफार
वर वर दिसला साधाभोळा
म्हटल चुकवू याचा डोळा
मागून पकडून माझा गळा
तो म्हणाला दिसतोस खुळा
हिशोब आधी माझा द्यावा
नंतर आत खुशाल जावा
हृदय ठेवून गहाण त्याला
कुंपण खोलून प्रवेश केला
गुलाब सुंदर ऐटबाज
फुलले होते गंधराज
जवळ जाता मिश्किल हसले
होते त्यावरी भुंगे बसलेे
हात मारुनि त्राण गेले
तरी न उठले भुंगे मेले
गडबड पाहून माळी वदले
सोड सोड गुलाब पुष्कळ
देईन तुला फूल अनमोल
म्हणती तयाला 'ब्रम्हकमळ'
किंमत पण जीवन सकळ
कबूल, तर आत्ता बोल
नाही तर खुलेल पोल.

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita