माझा सुखाचा त्रास

Started by mahesh jadhav, January 09, 2017, 11:07:07 AM

Previous topic - Next topic

mahesh jadhav

     माझा सुखाचा त्रास....
दररोज सकाळी ती मला दिसायची
केस विस्कटलेले, डोळे चीपडलेले
थोडा आळस देत देत बाहेर यायची
गॅलरीत येऊन उभी असायची
रोजचचं झालं होत....
सकाळी बाहेर येणं
विस्कटलेले केस सावरणं
त्यामुळे मलाही सवय झाली व
माझाही दिवस उगवायचा तो
तिच्याचं उगवत्या देहाकडे बघून......
तिची आवरासावर चालायची
कारण कॅालेज सकाळी असायचं
मलाही असायचं पण ....
माझं मन तयार होत नसायचं
तिच्याकडून डोळ्यांना परत आणावं म्हणून
तीच ती आवरायची सावरायची
मी फक्त बघत बसायचो ती जायीपर्यंत...
मंग माझी धावपळ व्हायची
अंघोळ करायची, बस सुटायची
कसं तरी एखाद्या गाडीला हात द्यायचा
व कॅालेज गाठायचं... त्यातही
थंडीचे दिवस असेल तर
इतका काकडा व्हायचा की बसं...
वर्गात गेल्यावर लिहिता येत नसायच
मंग काय...? लिहायचं नाटक करायचं
अशी सारी अवस्था व्हायची पण....
मला त्याचं वाईट वाटायचं नाही
किंवा रागही यायचा नाही
कारण ...आपल्या आवडत्या व्यक्तीचा
त्रासही गोड वाटतो ते काही खोटं नाही....

            कवी:- महेश भाऊसाहेब जाधव (नगरसूल)
                     9545094946
 
:-महेश भा.जाधव नगरसूल
     ९५४५०९४९४६