तो सध्या काय करतो?

Started by Akshay Bansode, January 09, 2017, 12:41:14 PM

Previous topic - Next topic

Akshay Bansode

तो सध्या काय करतो? असा प्रश्न तुम्हांला का पडू नये?

प्रेमाच्या नावाखाली तो अजूनही "फसवाफसवी" करतो ?
की
त्याचे  लग्न झाले असून तो बायकोला फसवून अफेयर करतो?
की
बायकोवर तो जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो?

तो सध्याही सिगारेटचे झुरके घेतो ?
की
दारुच्या नशेत तो रस्त्यांवर लोळतो?
की
परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे तो  पैसे योग्य ठिकाणी खर्चतो?

तो सध्या धर्माच्या नावाने दंगली करतो?
की
सत्यानारायण,उपास तो करतो?
की
एक माणुस म्हणून  तो जगायला लागला आहे?

त्याने चुकांपासून बोध घेतला आहे?
की
अजूनही त्याच चुका तो करतो?
की
तो आता पर्फेक्ट बनला आहे?

सध्या तो काय करतो?

- अक्षय.,७२१९३३१९३३