आठवण तू का आलीस ?

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 11, 2017, 12:32:02 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

आठवण तू का आलीस ?

आज नेहमी प्रमाणे
तुझी आठवण आली
सगळी हद्द पार करून गेली
आकाशात होतो मी
जमीनदोस्त करून गेलीस
घमंड माझ्या प्रेमाचा
शब्दाने तोडून गेलीस
डोळे हे भलतेच तीक्ष्ण
माझा मुर्दाच पाडून गेलीस
का गं आठवण तू का आलीस ?

घायाळ दिसतं होतीस
सोंग तुझे ते घेऊन
घायाळ मला करून गेलीस
प्रेम हे बहरत होते माझे
दुष्काळच पाडून गेलीस
शब्दांची मक्तेदारी माझी
मला निशब्द करून गेलीस
का गं आठवण तू का आलीस ?

आठवते का गं तुला
मन कठोर होते माझे
मन हळवे करून गेलीस
मन कुबेराच धन हे
मन भिकारी करून गेलीस
आलीस तर आलीस
पण माझी काय अवस्था करून गेलीस
का गं आठवण तू का आलीस ?


कवी - बुद्धभूषण गंगावणे ....
7738628059