कविता II दुःख आहे म्हणून तू आहे II

Started by siddheshwar vilas patankar, January 11, 2017, 05:19:36 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

दुःख आहे म्हणून तू आहे

दुःखाव्यतिरिक्त तुजकडे कोण पाहे

सुखात लोपल्या भक्तींभावना

सुखात तुला कुणी स्मरे ना 

माय लेकुरे सुखात झोपली

स्नानासाठी लवकर उठली

दिनचर्या ती रोजची ठरली

का स्मरू तुज , मज काळजी कुठली ?

असा चालला दिनक्रम नित्य

अकस्मात येई बाहेर सत्य

माउली उभी पुढे कोसळली

बघता बघता काळजी वाढली

स्मरू लागलो तुला निरंतर

देऊ नको मज माउली अंतर

रोज तुपाचा दिवा लावतो

त्यावर माऊलीचा श्वास चालतो

नास्तिक होतो आस्तिक झालो

तुझ्यापुढे नतमस्तक झालो

मला एवढे , मला तेवढे

मागत आलो तुझ्याच पुढे

तू आहे, हे माहीतच नाही

तरी आस मी तुझ्यात पाही

तूच जाहला विश्व नियंता

वाचावशील का मज माउली आता ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C