जीवच माझा तुझ्यात रंगलाय

Started by Gokul Patil, January 11, 2017, 05:47:16 PM

Previous topic - Next topic

Gokul Patil

जीवच माझा तुझ्यात रंगलाय


तू नेहमी सोबत असावी
असं काही नाही तू
रोज रोज भेटावीस
असं हि काही नाही

वेळ जेव्हा असेल तुला
तेव्हाच आपण भेटू
जर नाहीच मिळाला वेळ
तर चुकून कुठेतरी एकमेकांना गाठू

तुझा नकार पचवून हि
तुझीच जीवाला आस आहे
तू नाहीस जवळ तरी
या वेड्या मनाला तुझाच भास आहे

तू नाहीच मुळात माझी
हे मला चांगलंच ठाऊक आहे
जीवच माझा तुझ्यात रंगलाय
यात हृदयाचा काय दोष आहे ..  :)

गोकुळ पाटील  :)