नेता

Started by sanjweli, January 12, 2017, 08:37:48 PM

Previous topic - Next topic

sanjweli

११/१/२०१६

नेता

नेता हा कसला, कसलेला हा नेता
तरी कसा निवडून येतो नेता
पक्षाशी इमान तरी ठेवतो का नेता
पक्षाचं कागदी विमान बनवतो तो  नेता

आज इथं तर उद्या
तिथं असतो हा
जाऊ तिथं खाऊ
असते आपली ओळख
असतो  सवता सुभा

ह्याची टोपी त्याला
त्याची टोपी ह्याला
ना लेकाचा ना बापाचा
रक्तपिपासु बनतो हा नेता

बनवाबनवी चकवाचकवी
हजरजबाबी असतो हा
कधी प्यादा तर कधी वजीर हा
हर कसब अवगत तोच असतो नेता

कधी कॉंग्रेसचा तर कधी राष्ट्रवादीचा
ओळख झळकत ठेवतो नेता
कधी भाजप, तर कधी शिवसेना
अशी तळमळ कळकळ करत बसतो नेता

निवडणुकीचं रणशिंग फुकता
घरदार बदलत फिरतो नेता
सगळं काही बदलतो हा नेता
फक्त  बापचं बदलत नाही नेता

नोटांच्या पुडक्यांचा बागुलबुवा
दाखवत बसलेला असतो नेता
करतो बाजार गोरगरीबांच्या भावनेचा
काळ्यांचा पांढरा बाजार करतो नेता

केराची टोपली दर पंचवार्षिकला
भरत बसतो हा करकोचा
रंग बदलतो सरड्यासारखा
वीर लुटारु सार्वजनिक कर्मचारी नेता
गोल मटोल स्वत:ला
पांढरपेशा बनवतो नेता

ना तुझा ना माझा
ना ह्याचा ना त्याचा
मालक पण नसतो दिड दमडीचा
हा असतो  कसलेला हरहुन्नरी अभिनेता

सायकलचा ना कमळाचा
ना हातपंजाचा ना घड्याळाचा
बाणाचा ना आगगाडीचा
वफादार असतो नेता
हपापलेल्या त्याच्या पोटाचा

© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३