दूर तू असताना....

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 13, 2017, 12:04:44 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

दूर तू असताना....


दूर तू असताना
आभाळ तुझी जागा घ्यायचे,
आकार तुझे घेऊन....
मंद मंद लाजायचे..

ना एकही शब्द बोलायचे
ना पापणीही लावायचे,
टक लावून बघायचे
पण डोळ्यात भाव नसायचे..

कधी तू अचानक येता
ते आभाळ विस्कटुन जायचे,
तुझे हे सोंग घेण्याची कला
त्यांना कोण शिकवून जायचे..

लांब निघून गेलीस तू
स्वप्नात तुला बघायचे,
आभाळात दिसतेस तू
प्रतिबिंब तुझे मानायचे..

आता स्वप्नात येत नाहीस
सोडलेस आभाळातही दिसायचे,
कदाचित विसरलीस तू मला
आभाळाला काय दोष द्यायचे...

- बुद्धभूषण गंगावणे....
   7738628059