व्याकूळ चांदणी

Started by Parshuram Sondge, January 14, 2017, 04:07:41 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

मंद वारा, हा धूंद गारा
रात थोडी संथ झाली.
किनारी लाट तुझ्या मी
न सांगताच संथ झाली.

विरहाचे गर्द  निळे रंग
उरी हुरहूरता जीवघेणी
देहाची व्याकूळ फांदी
झुरे नभात ती चांदणी.
     परशु सोंडगे,पाटोदा
     9673400928
Pprshu1312