विसंगतीच्या सरी

Started by Shabdadhara, January 15, 2017, 02:16:36 AM

Previous topic - Next topic

Shabdadhara

सरली सारी रात्र ही आणि मावळले तारे
तरी जागा मी उशाशी, विसंगत हे सारे

दगडाच्या कणांस जेव्हा ओलाव्याचा स्पर्श होतो
बेधुंद गंध दरवळणरा, गोंधळवणारा हर्ष होतो

जो राकट होता करपत होता, भिजला अकस्मात
अंकूर नवे, गारवा नवा, ह्या काळ्या पहाडात

शमले होते सूर्यनिखारे आणि अंगणी होता गंध नवा
शोधण्या त्या अत्तराला, हे निघाले मंद मन बघा

शहारलेले हृदय होते, ओठांवरती गाणे होते
तळ्याकाठच्या एकाकीला, आज काही उणे होते

पहिल्या सरीत भिजताना मी, ऊगाच छप्पर शोधत होतो
फाटक्या छत्रीखाली, मी ऊगाच कोरड हुडकत होतो

काळोख होता, पाऊस होता, हवाहवासा वारा होता
जागणा-या डोळ्यांपुढे, सुंदरसा एक चेहरा होता

डोकावत होता चंद्रासव, जाग-या या स्वप्नामध्ये
अवसेच्या कळोख्या रात्री, चंद्रचांदणी कशी गगनामध्ये?

विसंगतीचे हे घेऊन कोडे जागत होतो एकला
कडाडणा-या आभाळाखाली, वादळ माझ्या सथीला

मेघ आले होते दाटूनी, माझ्या मनाच्या अंबरी
भावनांच्या सरी कोसळल्या, विसंगतीच्या सागरी

नवी सकाळ अभ्राच्छादित आणि पेंगलेले डोळे
त्या मळभात आला फोन तुझा, रविकिरणांत मन सुखावले