आठवणींत तु

Started by Dnyaneshwar Musale, January 15, 2017, 07:01:31 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

धरलेला ध्यास तुझा
आता सुटत  नाही
रुजलेला चेहरा तुझा
हृदयातुन मिटत नाही.

तु माझी नाही हे
मला पटत नाही
डोळ्यातलं पाणी
काही डोळ्यांतच आटत नाही

चेहऱ्याची मरमर काही
केल्या घटत नाही
निजलेली कलिका
तुझ्या शिवाय उठत नाही.

रंग वाटणारे फुलपाखरे
आता बागेतही फिरत नाही
तुझी माझी ओठावरची चर्चा
आता गावातही झिरत नाही.

उसवलेली मने एका टाक्यात
काय शिवत नाही
चुरगळलेली फुले एका धाग्यात
काय ओवत नाही.

समजुन घेतलं तु आता
झाली आहेस वेगळी
पण घेऊन जा जाताना
साठवलेली काव्य सगळी.