आता हा विरह........

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 16, 2017, 08:23:30 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

आता हा विरह........

हातात स्वप्नांची मशाल
पण पायात वेग नाही.
काळाकुट्ट भयाण अंधार
पण प्रकाशाची एक रेघ नाही.
सांगायचे आहे तुला खूप
पण बोलायला शब्दांची साथ नाही,
नाजुक परी तू मोरपिसा सारखी
पण तुला सावरायला मला हात नाही
तुझ्या नावाची धडधड हृदयात
पण धडधडायला हृदय नाही.
नाजुकसा प्राण तू माझा
पण प्राणासाठी श्वासच नाही.
भरभरून प्रेम भरलय गं मनात
पण प्रेम व्यक्त करायला तू नाहीस.
पिये येना गं लवकर परत
आता हा विरह मला सहन होत नाही 

  - बुद्धभूषण गंगावणे .
    7738628059.
    gangawanebuddhabhushan@gmail.com