जहरिल्या नागिणीस ....

Started by Asu@16, January 16, 2017, 11:35:20 PM

Previous topic - Next topic

Asu@16

जहरिल्या नागिणीस ....

प्रीत कुंभ तू भरून ठेविले
कितिक हृदयांतरी
लाख चुंबने घेऊन झाली
सरली न प्रीती
पिऊन झाले तुझ्या मुखाने
प्रीती सागर किती
तृषार्त परी मी अजुनि फिरतो
तुझ्या स्मृतींच्या पाठी
ओठ तुझ्या मी ओठी दिला
प्रेमरस वाहिनी
डसली मला तू अशी भयंकर
प्रेमविष दायिनी
चंदन शीतल गमले मजला
ओठ सखे वैरिणी
अग्निजिव्हा तव जाळुनि गेल्या
जहरिली नागिणी
तडफडतो मी तुझ्या विषाने
घेई मजला मिठी
प्रेमविष तव देई मजला
अमृताहुनि त्या प्रीती.

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita