आरोप

Started by गणेश म. तायडे, January 17, 2017, 01:28:47 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

फसवले नाही मी कुणा
ना घात मी कुणाचा केला
फक्त चाहले मी तिला
जिच्यावर प्राण वाहून दिला
ना दुखावले मी कुणा
ना जबरदस्ती कुणास केली
जेवढे दिले मनभरून दिले
ना कुणाची फसवणूक केली
नको पैसा अडका कुणाचा
प्रेमाचा मी उपाशी वेडा
सहत नाही आरोप एवढा
साऱ्यांनी जो माझ्यावर केला
पहा एकदा हृदयात माझ्या
प्रेमाच्या सावलीत तिला
पहा डोळ्यात माझ्या
आसवांच्या धारेत तिला
उभा कसाबसा आशेवर
विश्वास मजवर ठेऊन पहा
आरोप मजवर करणाऱ्यानो
एकदा मज ओळखून पहा

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11