अफ़ाट प्रेम माझं

Started by GaneshKayande, January 17, 2017, 10:49:30 AM

Previous topic - Next topic

GaneshKayande

माहित नाही मला आज काय होतंय,
आज मन फक्त तुझ्याच कडे ओढ घेतय!
इछा आहे आज तुला कोकणात घेऊन जाण्याची
समुद्राच्या किनारी तुझा हात घेऊन धावण्याची!
वाटतंय सूर्य मावळताना बाजूला बसून हळूच हाताला हात लावू ,
तुझा इशारा मिळाल्या वर घट्ट मिठी मारून सर्व जग विसरून जाऊ!
बघत राहू फक्त तुझ्या ओलावलेल्या पापण्यांना,
प्रेम करू तुझ्या समुद्र किनारीच्या पाऊण खुणांना!
वाटतंय आज तुला सर्व जगा समोर घेऊन जावं,
पक्षी बनून तुझ्यासोबत उंच उडाव !
मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला कळावं ,
नदी जशी समुद्राला मिळते तस तुझा प्रेम मला मिळावं!
         ~गणेश कायंदे
            8483941404