बाप....

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 17, 2017, 01:04:14 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

बाप....

लहान असताना मला बाबा बोलायचास
मोठा झालास बाबाच बाप केलस,
आम्ही दोघे म्हतारे झालो
म्हणून आम्हाला थेट आश्रमात न्हेलस.

घरात तुमच्या सोबत होतो,
तरी तुमच्यात असून आम्ही एकटे असायचो,
इथे आमच्या सारखेच लहानाच मोठ केलेल्या पोरानेच
ओसाड आयुष्य जगन्यास सोडलेले म्हतारे आहेत.

इथे खुप वेळा धडपडलोय पोरा
पण सावरायला माझ्या नातवाचे हात नाही,
येऊदे परत आम्हाला
सुनबाई भांडली तरी काही बोलनार नाही.

इथे एकटं असताना रडतो
तुझ लहानपण आठवून
पण तू धिलेल्या खुना ठेव्यात
फक्त आमच्या मनात साठवून.

आता हे मोकळ जग आम्हाला सोसत नाही.
आम्ही  नाही त्रास देनार तुम्हाला
मनात नसली तरी
घरात थोडी जागा द्या आम्हाला.

माहीत आहे आमच गबाळेपण
तुमच्या प्रतिष्ठेला शोभत नाही.
या म्हतारपणात फक्त साथ द्या
आणखी काही मागत नाही.

- बुद्धभूषण गंगावणे.
   7738628059
gangawanebuddhabhushan@gmail.com



Ashok_rokade24