अजूनही ....

Started by Kumar Sanjay, January 18, 2017, 12:03:52 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

क्षणभर थांबलेल्या
एका धुकाळलेल्या
रेल्वे स्टेशनवर
अनोळखी गदीॅत
हिवाळ्याच्या सदीॅत
ती ...

वार्यासंगे झुलणार्या
वेणीत बकुळफुल खोचून
पाठमोरी उभी अाहे

इतक्यात ! हवेच्या झुळकाणे
कानामागे असलेली लट
आलेली चेहऱ्यावर
अन् हाताने बाजूला सावरत
सहजच

तिच्या नयनांतील
इवल्याशा बाहुल्यांचा
काळाभोर रंग
पसलेला मनाच्या
क्षितिजावर उमटून
गेलेला कुष्णमेघ

अधरावर उमटलेल्या
काही सांकेतिक खुणा
न समजलेल्या
पायवाटे सारख्या
अनोळखीच

अन् निर्जन रूळावरुन
धावणारी रेल्वे
मनाच्या अंतरंगात
वाहून गेली
लाटेसारखी 

त्यांसोबत ती
आठवणीच्या
हिवाळ्यात
गोठलेली अजूनही ...

कुमार संजय

7709826774