माझा देश महान

Started by Asu@16, January 18, 2017, 02:37:28 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   माझा देश महान

पैसा असून गाठी
फिरतो बँकांद्वारी,
रोजच्या खर्चासाठी
माणूस झाला भिकारी.
उभा रांगेत सोडून कामकाज
देश प्रेमापोटी,
दगदग त्रास साहतो आज
उज्ज्वल भविष्यासाठी.
राव गेले, पंत चढले
प्रजा राहिली बेवारशी,
आश्वासनांची खीर खाते
गोड मानून, उपाशी.
पोटी उठे भुकेचा गोळा
गोष्ट क्षुल्लक, फारच लहान,
एक मुखाने फक्त बोला
माझा देश महान.
एकमताने राज्य करू
करू राजनिष्ठेचे रक्षण,
दुजा विचार नका करू
देशद्रोहाचे लक्षण.
रात्रीच्या दहशतीने
दिवस गरीब लाचार,
अंधाराच्या राज्यापुढे
सूर्य झाला पसार.

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita