क्षितिजा पलीकडचे प्रेम*

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 18, 2017, 09:48:47 PM

Previous topic - Next topic
*.क्षितिजा पलीकडचे प्रेम*

क्षितिजा पलीकडे राहतेस तू माझी प्रिया
मी आजही तुझी वाट पाहतोय
किती झुरतोय मी तुझ्यासाठी खुळा
अबोल या शब्दांना किती करू मी मनात गोळा
तू आहे क्षितिजा पलीकडे ये ना प्रिये
तू इकडे मी राहिलो तुझ्या आठवणीत
अश्रूंनी खेळ मांडला आहे चोही कडे
आता मी कसा येऊ तिकडे
तुझ्या विरह यातना खूप त्रास देतात ग इकडे
तुझं थोडं सुद्धा लक्ष नाही माझ्या कडे
त्या समुद्र किनाऱ्या वर आजही तुझंच नाव मी लिहू राहिलोय
तू पुन्हा येशील माझ्या आयुष्यात या
अपेक्षेने मी जगत राहिलोय
वाट तुझी मी त्याच किनाऱ्या वर आज ही पाहत राहिलोय
सूर्य हि रोजच उगवतोय रोजच मावळतोय
तेव्हा पासून मी रोजच तुझी वाट पाहतोय
तोही क्षितिजा पलीकडून आवाज देतोय
ते क्षितिजा पलीकडचे प्रेम आता तुझे नाहीये
ते क्षितिजा पलीकडचे प्रेम आता तुझे नाहीये

..✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर