गंगा ...

Started by Kumar Sanjay, January 19, 2017, 10:20:53 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

गंगेची निर्मळ माया
दाखवते वाहते जीवन
घांटाच्या काठावरती
कुणाचे पेटते सरण

राख भस्म लावलेला
उभा एक संन्यासी
गातो वंदन आरती
वार्यावर सोडून लेकरासी

दूरवरच्या प्रवाही लाटात
एक देहविकणारी वस्ती
विलीन होवून जाते
अांसवाच्या करुण भरतीत

नारायणाचे सोडले दार
किती तरी गंगानी
महादु:खाच्या उन्हाळ्यात
अाटले किती पानी

कुमार संजय

7709826774