एकले मागणे

Started by tusharberge, January 19, 2017, 09:27:25 PM

Previous topic - Next topic

tusharberge

साऱ्या जगाची मला वेदना दे,
विपर्यास दे, दुःख दे, अश्रू दे !
लाभो कुणा क्रूस , आसूड कोणा
त्यांच्या खुणा सर्व मातेंच दे!
मातें नाको मीलनातील धुंदी,
जळू मन्मना दे वियोगीं भावीं,
सामर्थ्य वृत्रारीचेही नको ते-
पडूं दे तुझे क्रूर शीर्षी पवी!


त्या वेदना आर्त सोसावयाला
मला धैर्य दे, स्थैर्य दे, शक्ती दे
येथील वैषम्य मांडावयाला
मला भाव दे , शब्द दे स्फूर्ति दे!
तुझी नको विस्मृती व्हावयाला
मला एवढयाशा सुखाचा क्षणे,
मातें सदा दुखी ठेवी जागी या
असे कुंतिचे ऐकले मागणे !


निशिकांत मोरेश्वर करकरे
ग्वाल्हेर १२/६/१९५६