पुन्हा ...

Started by Kumar Sanjay, January 20, 2017, 10:42:12 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

मी नदीवर कविता लिहिली
पण तु मला
प्रवाहीत का होवु दिले नाहीस
तंरगले माझे शब्द पाण्यात
कमळासारखे ...

मग माझ्या कवितेची
आस्थेने चोैकशी केलीस
लाट होवुन
अन् मी दूरवर जावून
आदळलो खंडकावर , पसरलो हिरव्या
कुरणावर, मातीच्या चिखलात खोलवर रूजून बसलो
पुन्हा नव्याने उगवण्याठी !!!




कुमार संजय
7709826774