असं कधीतरी घडावं.....

Started by kunalsj96, January 20, 2017, 01:55:13 PM

Previous topic - Next topic

kunalsj96

अस कधीतरी घडावं ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम करावं.....
तिने हळूच माझ्याकडे बघावं ,
मी बघतांना तिने हळूच लाजावं... ..
भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्यावं....
मी दिसताच तिने मग हळूच
हसावं,
आणि मी नसतांना तिने रडावं .....
तिला चिडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुल
द्यावं... ..
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव
निघावं ,
स्वप्नातही तिला मीच दिसावं..... .
असं कधीतरी घडावं ,
कुणीतरी नक्कीच माझ्या प्रेमात पडावं...