अधुरी गोष्ट...

Started by गणेश म. तायडे, January 20, 2017, 05:11:43 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

शब्द हरवून गेले
भाव विरून गेले
नजरा बदलल्या
स्पर्श हरवून गेले

हात हातातला
नकळत सुटत गेला
रेशमी धागा मनाचा
अलगद सुटून गेला

आसवे पापण्यातली
तीही आटून गेली
आठवणी हृद्यातल्या
त्याही विसरून गेली

सहवास आपल्यातला
कुठेतरी हरवून गेला
एक क्षण सुखाचा
तोही निघून गेला

का कधी कसे जुळले
आठवणीत राहून गेले
का कधी कसे तुटले
आसवांत वाहून गेले

जीवन जगताना नेहमी
तुझी साथ हवी होती
राहलो आज मी एकटा
गोष्ट प्रेमाची अधुरी होती

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11