तो

Started by kalpij1, February 02, 2009, 10:44:17 PM

Previous topic - Next topic

kalpij1

आता हांक तरी मारायची कुणाला
हांकेला ओ देणारा गेलाय
कक्षेबाहेर
अंतराळात ..
चमकतोय कधीचा
तारा बनून आकाशात .
इतर तारकांच्या संगतीत ..
तो पण बसलाय .
चंद्राच्या साक्षिन्..
माझ्या हतबल चहर्यावर्च्या
सुरकुत्या मोजत ...
माझ्या लटपटणा-या पायांची
हालचाल बघतोय तो...
पायात जोडवे आणि पैजन
घातलेले ...
नववधुचे मेहंदी लावलेल
कोमल पाउलं ..
आठवत नसतील काय त्याला
कां तो ते पण विसरला
माझं ते लावान्यरूप ..तो पदन्यास
माझ्या हालचाली न्याह्ल्नारा तो..
किती सहजपणे जाउन
बसलाय वर वर नभात ...
कधीही दृष्यात नं दिस्न्यासाठी
[http://b]कल्पी%20जोशी%20०२/०२/2009%20[/b]

grmane_apd

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय


गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..
:- Unknown