कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

Started by Abhishek D, January 14, 2010, 02:12:29 PM

Previous topic - Next topic

Abhishek D

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं

काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं

दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं

सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं

माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

santoshi.world


RAJESH

 :) खुपच छान मित्रा खुपच आवड्ली बर का..... तुज़ी परवानगी असेल तर मी मित्राना पाठ्वु का

Abhishek D

thanx.. an bindhast mitra pathaw ... parwangi kay tyat.. ulat ho ek pawti hoil mala ...

sanjay_123

अप्रतिम मित्रा......खुपच छान कविता आहे.........  ;)