कुष्णा ...

Started by Kumar Sanjay, January 20, 2017, 11:55:15 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

कधी एंकाकी पावा
कधी राधेची मीत
कांलिदीला सुचेना
तुझविन अमर प्रीत

केसातला मोरपंख
बांधते चैतन्याचे रुप
दसदिशातुनी दिसते
राधेला सावळे स्वरूप

तुच चिरंतन व्हावे
तुच गिरीधर व्हावे
असा लीलेचा अर्थ
सुरदासाने भजन गावे

मज भावते सारथी
रुप तुझे कुष्णा
अमु्त गीता वचनानी
मिटते जीवाची तुष्णा ...


कुमार संजय
7709826774