धर्म

Started by sanjweli, January 21, 2017, 04:43:45 PM

Previous topic - Next topic

sanjweli

पोटपाणी सर्वकाही
धर्म आमचा ना कोणता
खळगी पोटाची रिकामीच सारी
अनाथांचा नाथ तो
तोच अल्ला,येशु,ईश्वर,आमचा !!!!

देव दगडात नाही
त्याची काया रे निर्जीव
देव माणसात राही
ठेवा आपली श्रद्धा रे सजीव !!!

नाही कुणी वाली
या दीन दुबळ्यांना,
सगळ्यापुढे उभा
हा यक्षप्रश्न आमचा

प्राणी पक्षात कसा जातपात नाही
नाही माहीत त्यांना
भेद स्पृश्य -अस्पृश्याचा
तुच सांग अाता हा
जळता निखारा कोणता ?

दलित-सवर्ण,हिंदु मुस्लिम कुणी नाही
मानवता एक धर्म आमचा
येथे कट्टरतेला कुणाच्या थारा नाही
रंग लाल आमच्य सगळ्यांच्या रक्ताचा.

©शब्दांकन : महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३