माझीच रहा...

Started by गणेश म. तायडे, January 21, 2017, 05:18:28 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

मिठीत तू माझ्या रहा
कुशीत मला तू घे
हात फिरव केसातून
प्रेमाची तू उब दे

पहा एकदा डोळयांत
हृदयात माझ्या तू रहा
कर विश्वास माझ्यावर
साथ मला देऊन पहा

नको जाऊ तू दूर कधी
आसपास तू माझ्या रहा
नको सोडू तू साथ कधी
सोबतीस तू माझ्या रहा

तुटता ना तुटावे असे
बंध मनांचे जोडून जा
विसरता ना विसरे तू
अशी आठवण होऊन जा

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11