प्रेम आणि मित्र

Started by RAM NAKHATE, January 22, 2017, 07:33:15 AM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

      प्रेम आणि मित्र
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
तुझ्या प्रेमात गुंतलो होतो
नकारात उत्तर शोधत होतो
होशील माझी कधीतरी
विचार मी करीत होतो

तु नव्हतीस माझी
मी तुजाच प्रेमी होतो
तुझ्या विरहात मी
एकट्यात रडत होतो

अवघड होते माझे
बोलण्याची हिमंत नव्हती
घायाळ झालो मी एकुनी
प्रेम तुझे माझ्या मित्रावरती

मित्राने मज दिला धोका
तुझी यात चुक नव्हती
जोडलेस तु वेगळेच नाते
झाली आपली चांगली मैत्री

मित्र तुझा झालो सखा
मित्रास पडला प्रश्न वेगळा
सोडूनी दिल त्याने तुला
खेळ झाला हा आगळा-वेगळा
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
            - राम नखाते
       मो.नं. 9545013679