गेला तान्हुला..

Started by shashank pratapwar, January 14, 2010, 03:21:44 PM

Previous topic - Next topic

shashank pratapwar

विझले ते प्राणदिवे,
लाडक्या सोनुल्याचे ,
संपले गोड खेळ,
तुझ्या रांगत्या देहाचे.

आला होता तान्हुला,
हसू देवाचे घेउन,
पाहता जाइ माझा,
शीण दिसाचा निघून.

एकाएकी का रे असा,
रुसला तु माझ्यावरी,
काही कुणा न सांगता,
गेला दूर देवाघरी.

ओलावल्या डोळ्यांनी रे ,
दूध भात करी आई,
मायबाप झालो वेडे,
जीव जीवातच नाही.

बोबड्या बोलाचे तुझ्या,
भास आता घरादारा,
अड़गळीच्या खेळण्यात,
गुंतला रे प्राण माझा.

- शशांक प्रतापवार

santoshi.world


amoul



gaurig

ओलावल्या डोळ्यांनी रे ,
दूध भात करी आई,
मायबाप झालो वेडे,
जीव जीवातच नाही.
:( :(
chan aahe kavita.......