तुझ्या आठवांनी !!

Started by श्री. प्रकाश साळवी, January 22, 2017, 01:34:29 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

तुझ्या आठवांनी !!
----------------
तुझ्या आठवांनी अजुन का छळावे?
नयनात आसवांनी अजुन का गळावे?
कळणार कसा हृदयी अंधार दाटलेला
मिटल्या पापण्यांना सांग कसे हे कळावे?
सुकला प्रित वृक्षही ग्रिष्मात पानगळीने
निष्पर्ण भावनांचे नाते कसे जुळावे?
पाहीले दूरूनी मम हृदय रक्ताळलेले
सांग मनभावनांनी अजुन का फुलावे?
सांडले प्रितपुष्प माझे भग्न हृदयपाकळ्यांचे
एकेक पाकळीने किती अंतरी जळावे?
चालतो एकटा किती वाट दूरची मी
पासुन आठवांच्या किती दूर मी पळावे?
पाठलाग आठवांचा अजुन सोसतो मी
अंतरात माझ्या किती मी कळवळावे?
**
प्रकाश साळवी
22-01-2017