सायली

Started by Balaji lakhane, January 22, 2017, 02:53:19 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

सायली...

पिल्लू ,
माझी रूसली,
अबोल होऊन बसली,
काढतो रुसवा,
मी...

देवून ,
तिला उपमा,
लिहीतो एक कविता,
ती हसेल,
आता...

विचारतो
का रुसलीस,
सांग ना मला,
मी रडेल,
नसता..

ती,
मग बोलली,
नयनात ती पाहीली,
थोडस हसून,
लाजली..

म्हणते,
का रडतो,
तू पोरगी का
मी हासतो,
लगेच..

©बालाजी लखने(गुरू)
     उदगीर जिल्हा लातूर
     दि..२२/१/२०१७