आरसा....

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 22, 2017, 08:00:32 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

आरसा....

तुझी आठवण येताच 
तू समोर उभे राहावे ,
मी पाहताच तू थोडी लाजावी
थोडे गालात स्मित हसावे.
मी तुझ्या डोळ्यात हरवून जावे,
तुझे हात अलगत हातात घ्यावे.
तुला समुद्र किनारी घेऊन जावे,
त्या ढळणार्‍य सूर्य प्रकाशात
फक्त तू आणि मी असावे
तू तुझे डोके अलगत
माझ्या खांद्यावर ठेवावे
मी तुझ्या केसात हात घालावे
तुझ्या केसांच्या बटांनी खेळावे
थोडा  तुझा  तोल जावा
थोडा माझा तोल जावा
तू माझ्या मिठीत यावे
आपण मिठीत एकरूप व्हावे
तू अलगत डोळे मिटावे
तुला माझ्या स्वाधीन करावे 
मी तुला हळुवार उचलावे
तुला बाहूंच्या झुल्यात झुलवावे
एकमेकांत तल्लीन व्हावे. 
आपण कितीही दूर असलो
तरी आपल्याला हे जमावे
असा "आरसा" हवा आहे मला....

- बुद्धभूषण गंगावणे.
   7738628059