माणसाने माणुस मारून फ़क्त आणि फ़क्त जात जिवंत ठेवली आहे.

Started by किरण फापाळे, January 23, 2017, 12:14:08 PM

Previous topic - Next topic

किरण फापाळे

मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"
मी "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"
मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"
मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"
मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही.....
वाट पाहतोय.......
"ती"माणसे गेली कुठे
माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त
जात जिवंत ठेवली आहे..