तुझी वाट...

Started by गणेश म. तायडे, January 23, 2017, 05:57:43 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

जसा मी आज आहे
तसाच पुढे हि राहील
वादा आहे माझा तुला
मी फक्त तुझाच राहील
अश्रू नसतील डोळ्यांत
तुला सुख एवढं देईल
पाहण्याआधीच स्वप्ने
तुझ्या ओंजळीत ठेवील
ओठांवरचे हसू तुझे
कधी ओसरणार नाही
नाराज मी तुला कधी
होऊ देणार नाही
वाट तुझी पाहत आहे
तुझ्या वाटेत मी बसून
कर एकदा विचार माझा
हस माझ्याकडे बघून
जोड नातं माझ्याशी
रुसवे मनातले काढून
बस जवळ तू माझ्या
माझ्यात गुंग होऊन

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11