उघड दारं हृदयाची

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 24, 2017, 05:38:20 AM

Previous topic - Next topic
उघडून दारं हृदयाची
बदलून टाक नभीच्या छटा
नसतेस ना तू या डोळ्या समोर जेव्हा
होते घालमेल मनाची
वेळ कसा जातो तो कळतच नाही
मोजमाप करतो मी क्षणांची
डोळ्यांसमोर तूच असतेस
तमा नसते मज कशाची
मृग जळा प्रमाणे तुझी प्रीत
सखे ग अश्रू नयनी का आणते
दुःख सारे विसरुनिया हसू चेहऱ्या वर मी आणीतो
तुझा स्पर्श हा हवा हवा सा मज स्वप्न सुखाचे दाखवितो

...✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर